विशाल कदम
लोणी काळभोर : (ता. हवेली) येथील लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय भीमराव भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष प्रताप बोरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते.
ही निवडणूक प्रक्रिया निवडणुक निर्णय आधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१५) पार पडली. या निवडणुकीत संजय भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय आधिकारी एस. एस. चव्हाण यांनी भालेराव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, दिलीप काळभोर, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळभोर, रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, बाळासाहेब काळभोर, सचिन काळभोर, गणेश गायकवाड, संस्थेचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्सयान, सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांची मूहुर्तमेढ रोवताना १०४ वर्षापूर्वी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेकडून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपात कारभार चालू आहे.
आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भालेराव यांनी सांगितले.