भिगवण : भिगवण पोलीस यांच्याकडून भिगवण परिसरात नावाजलेल्या भैरवनाथ विद्यालय शाळेमध्ये नुकतेच विविध विषयांवरती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन पर कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी विदयार्थी व विद्यार्थींनी यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श वेळीच कसे ओळखायचे, सायबर, विनयभंग, पोस्को आदी विषयांवर माहिती दिली. विद्यार्थी, विद्यार्थीनींबाबत रस्त्याने येताना जाताना एखादे गैरकृत्य, पाठलाग यासारखे प्रकार होऊ नयेत, वाहन चालविण्याचा परवाना असल्याशिवाय वाहन चालू नये, वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावेत, यासारख्या विविध विषयावर मार्गदर्शनपर काही सूचना दिल्या.
विशेषतः अल्पवयीन दुचाकी चालक त्यांचे पालक यांनी मुलाच्या हातात चावी देताना विचार करावा. कारण आता दुचाकी किंवा चारचाकी मुळमालकावर गुन्हा दाखल होत असल्याने अल्पवयीन मुलांच्या हाती गाडीची चावी देऊ नका, शाळेच्या बाहेर शाळा सुटल्यानंतर जे टवाळखोरी करीत गाडीवरून फिरतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले.