पुणे : कोर्टमॅरेज करुन विधीवत लग्नासाठी हुंड्याची मागणी करुन नांदविण्यास नकार देणार्या पतीसह चौघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकणी एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार पती निरंजन थोरले, सासु कल्पना थोरले, सासरे हुवाप्पा थोरले आणि नंणद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, निरंजन थोरले हा एका शास्त्रज्ञांच्या हाताखाली काम करीत आहे. त्याने फिर्यादी यांनी आपण अगोदर कोर्ट मॅरेज करुन नंतर विधीवत लग्न करु असे सांगितले. त्यानुसार (ता. १८) ऑक्टोबरला त्यांनी कोर्टमॅरेज केले.
त्यानंतर निरंजन याला पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथे जायचे होते. त्यासाठी त्याने विधीवत लग्न करायचे असेल तर हुंड्याची मागणी केली.
दरम्यान, फिर्यादी ही सासरी गेली असता तिला नांदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी अधिक तपास करीत आहेत.