पुणे : देशात आणि राज्यात सर्वात चर्चेत राहिलेली बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलीस आणि युपीएससीला नोटीस पाठवत तुर्तास तिला अटक न करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या प्रकरणावरील पुढील तपासणी 21 ऑगस्टला होणार आहे.
Former IAS trainee Puja Khedkar has sought anticipatory bail from the Delhi High Court. The matter is being heard by a bench led by Justice Subramanium Prasad. Senior Advocate Siddharth Luthra is representing Khedkar, while Naresh Kaushik is representing the UPSC. The court is… pic.twitter.com/sfzAffia8H
— ANI (@ANI) August 12, 2024
या सुनावणीदरम्यान पूजा खेडकर यांची बाजू ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी मांडली. तर नरेश कौशिक यांनी युपीएससीची बाजू मांडली. जामीन नाकारणा-या जिल्हा कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने दिल्ली पोलीस आणि युपीएससीला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण विचाराधीन असताना खेडकर यांना अटक करु नये, असे निर्देश हायकोर्टाने तपास यंत्रणेला दिले आहे. तसेच पूजा खेडकर यांना तत्काळ अटक करणे गरजेचं नाही असे म्हटले आहे.
या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीदरम्यान त्यांना अटक करण्याची गरज नाही, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.