छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार याचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाहीत, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असा इशाराच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिला आहे. ते मराठवाड्यात प्रसार माध्यामांशी बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
माझा आणि मनोज जरांगे यांचा काहीही संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार मनोज जरांगे यांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ… माझ्या नादी लागू नका… माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलतांना म्हणाले, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्या. महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत. अनेक नोकऱ्या आहेत, नोट वापरले तर पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावात. आर्थिकदृष्ट्या जो मागास आहे त्याला आरक्षण दिले जाते. मनोज जरांगे आणि माझा काही संबंध नाही. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.