शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरूर) येथील एका हॉटेल बाहेर कारमधून दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत १ लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त केला. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार जनार्दन सुरेश शेळके (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापू जीलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी हर्षद शाहदेव लाटे (वय २४ रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हर्षद हॉटेल येथे एक युवक कारमधून देशी विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक – गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार जनार्दन शेळके, तुषार पंधारे, शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांनी सदर ठिकाणी पाहणी करुन कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहेत.