आपलं घर आकर्षक दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, घराची सजावटही केली जाते. त्यात महिलावर्गासाठी स्वयंपाकघर अर्थात किचन हा जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणूनच किचनमध्येही डेकोरेशन करण्याला प्राधान्य दिलं जातं. तुम्हीदेखील किचनमध्ये इंटिरीअर डेकोरेशन करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टींची माहिती देणार आहोत.
किचन स्वच्छ आणि आकर्षक दिसण्यासाठी इंटिरीअर बनविले जाते. पण, चुकीच्या इंटिरीअरमुळे किचनमध्ये वावरणेही कठीण होते. त्यामुळे चुकीचे व्हेंटिलेशनमुळे किचनमध्ये धूर आणि दुर्गंधी पसरू शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी किचनमध्ये उत्तम प्रतिचा एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी बसवणे आवश्यक आहे. किचनमध्ये पुरेशी स्टोरेज नसल्यामुळे किचन चांगलं दिसत नाही. त्यामुळे कॅबिनेट, ड्रॉर्स आणि शेल्फ् नीट बनवून घ्यावेत.
किचनमध्ये वस्तूंची चुकीची मांडणी करू नये. सिंक, स्टोव्ह आणि फ्रीज योग्य ठिकाणी आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. याकडे लक्ष दिल्यास किचनमध्ये काम करताना अडचण जाणवणार नाही. तसेच किचनमध्ये योग्य प्रकाश येईल, अशी सोयही करावी.