नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली. कुस्तीमध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगाट ही सामन्यामधून अपात्र झाली आहे. तिने 50 किलो वजनामध्ये अंतिम फेरी गाठली होती मात्र तिच्या वजनामुळे विनेशला बाहेर काढण्यात आले. सामन्याच्या काही वेळापूर्वी अवघे 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण देशातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
Vinesh, you are a champion among champions! You are India’s pride and an inspiration for each and every Indian.
Today’s setback hurts. I wish words could express the sense of despair that I am experiencing.
At the same time, I know that you epitomise resilience. It has always…
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2024
नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, “विनेश तू चॅम्पियन्समधील चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस. तू प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली आहेस,” असं म्हणतं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “आज घडलेली घटना फार वेदनादायक आहे. मला जे काही वाटत आहे ते शब्दात मांडता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याचवेळी मला तू या मधून बाहेर येण्याची क्षमता ठेवतेस याची कल्पना आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना पंतप्रधानांनी विनेशला धीर देत पुन्हा दमदार पुनरागमन करशील असा विश्वास व्यक्त केला आहे. “तू कायमच समोर आलेल्या आव्हांनाना तोंड दिलं आहे. तू यामधून अधिक भक्कमपणे पुनरागमन करशील. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत,” असं मोदींनी म्हटलं आहे.
कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो वजनामध्ये अंतिम फेरी गाठली होती. तिने सुवर्ण पदक घेऊन मायदेशी परतेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र तिचे ऑलिम्पिक पदक थोडक्यासाठी हिरावले गेले आहे. विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. याचे कारण त्याचे वजन हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला कोणत्याही श्रेणीमध्ये केवळ 100 ग्रॅम जास्त वजन भत्ता दिला जातो, परंतु विनेशचे वजन यापेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे.
विनेश फोगाट 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिने प्रवेश करुन इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची फायनलमध्ये प्रवेश मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.