-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : बँक ऑफ इंडिया मध्ये नकली नोटा आहेत का, ते मी चेक करुन देतो असे सांगून हातचलाखीने नोटांच्या बंडलातील 19 हजार रुपये लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिमन्यु शंकरराव कांबळे, (वय 69, व्यवसाय सुखवस्तु, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे.) यांनी फिर्याद दिली आहे.
अभिमन्यु कांबळे हे न्हावरा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील बँक ऑफ इंडिया मध्ये गेले होते. तेव्हा बँकेमधुन 50 हजार रूपये काढुन बँकेमध्ये पैसे मोजत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी येवुन बसला. व या पैशामध्ये नकली नोटा आहेत मी चेक करून देतो असे म्हणुन त्यांच्या कडील 50 हजार रूपये स्वतःच्या हातात घेऊन हात चलाकीने त्या पन्नास हजार रुपयामधील 19 हजार रुपये लांबवले.
याबाबत अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थेउरकर करत आहेत .