पुणे : विवाहबाह्य संबंध ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह महिलेला अटक केली. रुक्मिणी ऊर्फ सोनू सिद्धेश्वर कवडगावे (वय ३४, रा. पॉवर हाऊस, फुरसुंगी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती सिद्धेश्वर सुभाष कवडगावे (वय ३५, रा. फुरसुंगी, पुणे, मूळ- ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) आणि पूजा शिवदार गोंदकर (वय ३०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी व्यंकट यशंतराव सावळे (वय ६६, रा. कन्हेरी गाव, देशमुखनगर, लातूर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना पॉवर हाऊस, फुरसुंगी येथे (ता. हवेली) येथे ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान घडली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या मुलीला आरोपी लग्नामध्ये हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून भांडण, शिवीगाळ, मारहाण करत मानसिक आणि शारीरिक देत होता. तसेच, पूजा गाडेकर हिच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध ठेवल्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून रुक्मिणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव पुढील तपास करत आहेत.