नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरणाऱ्यांची आकडेवारी समोर आली आहे. 31 जुलैपर्यंत सुमारे 7.28 कोटी लोकांनी आयकर रिटर्न भरले आहेत. आयकर विभागाने ही माहिती दिली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.5 टक्के अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते.
31 जुलै 2024 पर्यंत मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी दाखल केलेल्या एकूण ITR ची संख्या 7.28 कोटींपेक्षा जास्त आहे, जी जुलैपर्यंत दाखल केलेल्या मूल्यांकन वर्ष 2023-24 (6.77 कोटी) च्या एकूण ITR पेक्षा जास्त आहे. सुमारे 72 टक्के करदात्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे, तर 28 टक्के करदात्यांनी जुन्या कर प्रणालीमध्ये कर भरल्याची माहिती समोर आली आहे.
31 जुलैला ITR दाखल करण्याची प्रक्रिया एका दिवसात 69.92 लाखांहून अधिक अधिक झाली. तर एसेसमेंट इअर 2024-25 साठी दाखल केलेल्या एकूण 7.28 कोटी ITR पैकी, नवीन कर प्रणालीमध्ये 5.27 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत.