सोलापूर : महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लावतो. त्यापोटी २० लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी सुभाष गणपतराव वाघमारे (रा.मोदीखाना, सोलापूर) यांनी आपली मुलगी दिपाली हिला फलटण येथील मोधोजी महाविद्यालयात प्राध्यापक पदाची नोकरी लावतो म्हणून आरोपी तुळशीदास तात्याबा जाधव (रा. सोलापूर) यास १ मे २३ ते २५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत २० लाख रुपये दिले.
काही महिन्यानंतर नोकरी लागत नसल्याचे कळल्याने फिर्यादीने आरोपीकडे पैशाची मागणी केली. आरोपींनी त्यांना युनियन बँकेत पैसे भरलेली दहा लाख रुपयाची बनावट पावती फिर्यादीच्या व्हाट्सअप वर पाठवून दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमारे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात जाधव याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.