Health Tips : पावसाळ्यात डासांच्या पासून होणाऱ्या आजाराचा धोका वाढत असतो त्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि इतर डासांपासूनच्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत असते. या डेंग्यूच्या तापाला चिकनगुनिया सुद्धा म्हटले जाते. यात शरीर तापाने अक्षरश: बेजार होत असते. या आजारात आपले सांधे आणि डोके दुखत असते. डासाच्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या माध्यमातून विषाणूजन्य ताप येत असतो. या आजारावर ॲलोपथीच बेस्ट मनाली जाते. आजारातून बरे होताना ॲलोपथीची औषधे असताना सोबत आपला आहार विहार बदलल्यास कमजोरीतून लवकर बाहेर पडतो.
कमजोरी दूर करायला काय खावं..?
1. दूधाचा वापर
डेंग्यूतून लवकर बाहेर पडायचं असेल तर रोज गरम दूध प्यायल्याने देखील फायदा होतो. दूधात अनेक पोषक तत्वं असतात. ज्यामुळे शरीर हेल्दी बनते आणि उत्साह वाढतो.
2. ड्रायगन फूड, किवी लिंबू वर्गीय फळे खावीत
डेंग्यूच्या ताप उतरल्यानंतर शरीराची इम्यूनिटी पॉवर वाढयावची असेल तर किवी, ड्रॅगन फूड किंवा संत्र्यासारखी लिंबूवर्गीय आंबड फळे खावीत.यात विटामिन सी, एंटी-ऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त होऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
3. लिक्विड डाएटचा वापर वाढावा..
शरीरातील कमजोरी घालविण्यासाठी पातळ अन्नपदार्थांचा वापर करू शकता. पाणी आणि् फ्रूट ज्यूस भरपूर प्यावा अर्थात घरच्या घरी ज्यूस केलं तर खूप चांगल. डाएटमध्ये ग्लूकोजचे पाणी प्यावे, नारळ पाणी, लिंबू पाणी, सरबत पिणे फायदेशीर असते परंतू स्वच्छता असलेल्या ठिकाणचे सरबत प्यावे.
4. अंडी खावेत..
फक्त डेंग्यूच नाही तर कोणत्याही आजारात जर पटकण आपल्याला कमजोरी घालवायची असेल तर प्रोटीन गरजेचे असते. अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन- बी, पोटॅशियम असते. ज्यामुळे डेंग्यूनंतर शरीर मजबूत होण्यासाठी मदत होते.
5. जेवणात हिरव्या पालेभाज्याचा वापर करावा..
आपल्या आहारात मोसमी पालेभाज्यांचा जास्त वापर करावा. भाज्याचे सूप देखील करुन पिल्यास फायदा होईल. जास्त तळलेले तेलकट आणि मसालेदार आणि तिखट काही खाऊ नये. कॅफीन आणि हाय कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ उदा. चहा आणि कॉफी तसेच मद्यपान आणि सिगारेट यापासून लांब राहा.