पुणे : राज्यात थंडी वाढताना दिसत आहे. सध्या पावसाळी वातावरण निवळले असून उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहेत. राज्यात तापमानाचा पारा घसरता पाहायला मिळत आहे. किमान तापमान हे ११ अंशापर्यंत घसरले असून आजपासून या तापमानात अजून घट होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाब अंदाज वर्तवला आहे.
सध्या कोमेरिन भार आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरु झाला आहे. उत्तर भारतात थंडी वाढू लागली असून दिल्लीला निचांकी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
कोकण आणि राज्याच्या दक्षिण भाग वगळता उरलेल्या राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मुंबईतील सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार असल्याचे अंदाज वर्तवला आहे. राज्यातील तापमान पुणे ३१.२, अहिल्यानगर ३१, धुळे (११),जळगाव ३२.८,कोल्हापूर ३०.३, महाबळेश्वर २४.५, नाशिक ३१.३, निफाड ३०.४, सांगली ३१.९, सातारा ३०.७, सोलापूर ३४.४, सांतक्रुझ ३५.८, डहाणू ३४.३, रत्नागिरी ३५.८, छत्रपती संभाजी नगर ३१,८.