पुणे : सध्या राज्यात मान्सून सक्रीय झाला हे. बहुतांश भागात पाऊस कोसळत आहे, तर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या, आज कोकणात पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
विदर्भात पावसाचा यलो अलर्ट..
आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
पेरणीच्या कामांना गती..
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.