आजचे हवामान: भारतीय हवामान विभागाने (IMD) देशभरात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच अनेक प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशभरात उत्तर-पश्चिम भागातील तापमान 3-5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राचे तापमान 3-5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे, तर पश्चिम हिमालयीन प्रदेशातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
काही प्रदेशांमध्ये पूर्व-मान्सूनची शक्यता
केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसह काही प्रदेशांमध्ये पूर्व-मान्सून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रदेशांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अनेक प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता
केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येसह अनेक राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे या भागातील तापमानात काहीसा दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. पश्चिम गुजरात, कोकण आणि विदर्भासह अनेक प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने या प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील उंच भागात पाऊस पडला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, राज्यभर अनेक ठिकाणी आकाश स्वच्छ राहण्याची आणि उच्च तापमानाची शक्यता आहे.
२७ मार्च रोजी महाराष्ट्रातील एकूण हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असली तरी अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.