Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Report: मुंबईत संततधार, समुद्राला मोठी भरती; पुण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 25 October 2025, 8:30
Weather Report: Continuous rain in Mumbai, high tide in the sea; Yellow alert for rain in many districts including Pune

Photo-Social Media

पुणे: गेल्या दोन दिवसांपासून (Weather Report) मुंबईतील विविध भागात (Rain Alert) पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सध्या मुंबईत अंधारमय वातावरण असून दुपारी 12.38 वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. या वेळी सुमारे 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर जाणे टाळावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई आणि उपनगरात पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, पुणे शहरातही हवामान विभागाने आज पावसाचा ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. पुण्यासह लातूर, नांदेड, नाशिक, सातारा आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही हा अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे.

पावसाच्या या संततधारेमुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या खडकवासला धरण साखळीत 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. याच काळात गेल्या वर्षी धरणात सुमारे 17.98 टीएमसी पाणीसाठा म्हणजे 61.12 टक्के साठा उपलब्ध होता. यंदा त्यापेक्षा सुमारे 7 टीएमसीने जास्त पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार प्रमुख धरणे आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने या सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. या साठ्यामुळे पुणे शहराला पुढील काही महिन्यांसाठी पाण्याची कोणतीही अडचण भासणार नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा जोर धरला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21
Next Post
Gold Silver Rate

Gold-Silver Rate Today: दिवाळीनंतर सोन्याच्या दरातील घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा रेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp