weather News : पुणे : जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सून अजून सक्रीय झालेला नाही. वाढत्या उकाड्यामुळे जनता हैराण झाली आहे. यातच धरणांमधील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. परिणामी पाणी टंचाईची समस्या तीव्र होऊ लागली आहे. नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू महिन्यात टँकरची मागणी वाढली आहे. (weather News)
जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सून अजून सक्रीय झालेला नाही.
दरवर्षी साधारणपणे जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून सक्रीय होतो. मात्र, अद्यापही धुवाधार पावसाला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. (weather News)पुण्यात जूनच्या अखेरीस टँकरची मागणी कमी होते. कारण मान्सून सक्रीय झालेला असतो. पण यावर्षी उलट झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू महिन्यात टँकरची मागणी वाढली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.(weather News)
सध्या आंबेगाव, जून्नर आणि खेड या तीन तालुक्यांतील ६७ गावांत पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातील तीन तालुक्यांतील एकूण ६७ गावं पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या टँकरच्या दिवसाला १३६ फेऱ्या होत आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक १६, खेड १३ आणि जुन्नरमधील १० गावं वॉटर टँकरवर अवलंबून आहेत.(weather News)
दरम्यान, मागच्यावर्षी १६ जूनला ५९ गावातील ३०८ खेडेगावात ६६ टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. यंदा तुलना करता टँकरची संख्या ४४ आहे. पण पाण्याची मागणी करणाऱ्या गावांची संख्या ६७ आहे. २२ जूनला पुण्यात मान्सूनच्या धारा बरसतील, अशी अपेक्षा आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील विहिरी आणि धरणातील पाणीसाठा आटत चालला आहे, त्यामुळे टँकरची मागणी वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.(weather News)