Weather News : नांदेड : निरभ्र आकाशात सूर्य आग ओकत असतानाच गुरुवारी (ता. २२) दुपारी सूर्याभोवती दिसलेले तेजोवलय जालना शहरातील नागरिकांनी अनुभवले. पावसाळ्याच्या सुरुवातीला अतिउंच प्रदेशाकडील भागात अशा प्रकारचे तेजोवलय दिसून येते. परंतु राज्याच्या काही भागांत आज नागरिकांना या खगोलीय घटनेचे साक्षीदार होता आले. सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत सूर्याभोवतीचे तेजोवलय स्पष्टपणे दिसत होते.(Weather News)
अतिउंच प्रदेशाकडील भागात अशा प्रकारचे तेजोवलय दिसून येते.
या तेजोवलयाला इंग्रजीमध्ये हालो असे संबोधतात. कधी कधी आकाशात अतिउंचावर विरळ ढग तयार होतात. त्यामध्ये बर्फाचे असंख्य स्फटिक म्हणजे क्रिस्टल्स असतात. त्यांचा आकार षटकोनी असून, अपवर्तन कोन ६० अंशांचा असतो. सूर्याचे किरण बर्फाच्या या स्फटिकांतून जाऊ लागले की, मूळ दिशेपासून २२ अंशाने विचलित होतात.(Weather News) हीच तेजोवलयाची कोनीय त्रिज्या असते आणि यातूनच सूर्याभोवती २२ अंश कोनीय त्रिज्येचे प्रकाशाचे वर्तुळ निर्माण होते. ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर प्रकाश पडल्यानंतर ते २२ अंशांच्या कोनातून निरीक्षकांकडे वळतात, त्यामुळे सूर्याकडे पाहणाऱ्याला सूर्याभोवती असे मनोहारी तेजोवलय दिसते.(Weather News)
आकाशात अनेक खगोलीय घटना घडत असतात. त्यातली अनेक घटनेबद्दल आपणाला कुतूहल असते. मात्र, आपण त्याबाबत अनभिन्न असतो. अशीच एक खगोलीय घटना जालनावासीयांनी अनुभवली. या खगोलीय घटनेबाबत बोलताना खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, आकाशात अति उंचीवर साधारण वीस हजार फूट आणि त्याच्याही वर असलेल्या सिरो स्टेटस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबा ऐवजी बर्फाचे कण तयार होतात हे खूप उंचीवर असतात. या ढगांची जाडी इतर ढगांपेक्षा कमी असते आणि हे ढग संपूर्ण आकाशात पसरलेले असतात. हे ढग एवढे पातळ असतात की त्यातून सूर्याचा प्रकाश किंवा चंद्राचा प्रकाश स्पष्टपणे पाहता येतो आणि याच ढगांमध्ये बर्फाचे स्फटिक असतात या बर्फांच्या स्पटिकांचा आकार षटकोनी असतो. म्हणूनच ते प्रिझमचे काम करतात.(Weather News)
औंधकर म्हणाले की, प्रकाशाच्या नियमानुसार प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रवेश करतो तेव्हा प्रकाश आपली दिशा बदलतो. यामुळे ज्यावेळेस सूर्य किंवा चंद्रप्रकाश यातील स्फटिकांमधून जातो, त्यावेळी हे प्रिझम त्या प्रकाशाला त्याच्या मूळ दिशेपासून एक्झॅक्टली २२ अंशाच्या कोणात वळवतात. म्हणजे आपल्यात आणि सूर्य किंवा चंद्राकडून येणाऱ्या प्रकाशात २२ अंशाचा कोण होतो. यावेळी आपल्याला सूर्य किंवा चंद्राभोवती तेजोवलय दिसते यालाच आपण २२ अंश हॅलो असेही म्हणतो.
दरम्यान, आकाशात तेजोवलय दिसते, त्यावर्षी पाऊस कमी पडत असल्याचे निरीक्षण आहे, असं एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.(Weather News)