Weather Forecast : पुणे : सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. यामुळे आता आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होणार आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. (The wait is over, Monsoon enters Kerala; Information from India Meteorological Department)
मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज ८ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. (Weather Forecast) पुढील 48 तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहचणार आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तळकोकणात 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता
केरळमध्ये यंदा मान्सून चार दिवस उशिरा येऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले होते. मात्र, जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला आहे. (Weather Forecast) दक्षिणेकडील राज्यात मान्सून सुरु होण्याची सामान्य तारीख 1 जून असते. परंतु यंदा मान्सूनचा हंगाम 4 जूनपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र, आज मान्सून दाखल झालाय. दरम्यान, तळकोकणात 16 जूननंतर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल एक आठवडा विलंब झाला आहे.
मान्सून दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून लाबल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. लवकरच राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने उकाड्यातून नागरिकांची सुटका होईल.
IMD ने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून केरळमध्ये आज म्हणजेच 8 जून रोजी दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळ, तामिळनाडू दक्षिण, कोमोरिन क्षेत्राचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Good News : पुणे ठरले राज्यातील पहिलं तर देशातील दुसरं ‘हरित शहर’…
Pune News : खळबळजनक ! पुण्यातील इंडसइंड बँकेत दिवसाढवळ्या चोरी; चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद