Vidarbha Rain Update : नागपूर : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला तसेच जनतेला अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरापासून गायब असलेल्या पावसाने आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासून विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरा राजा सुखावला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय पेरणीसाठी पावसाची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. (Vidarbha Rain Update) येत्या काही तासांत विदर्भातील अन्य जिल्हे आणि मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेला पाऊस सकाळी थांबला आहे. (Vidarbha Rain Update) चंद्रपुरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. त्यामुळं सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भल्या पहाटेपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. याशिवाय अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी रिमझिम पावासाच्या सरी कोसळत असल्याची माहिती आहे.
वर्धा, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत देखील ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाल्याने संध्याकाळपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस विदर्भात मान्सूनचे वारे सक्रीय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. (Vidarbha Rain Update) अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रिवादळाने मान्सूनची वाट अडवून धरली होती. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने तळकोकणातच मुक्काम ठोकलेला होता. पुढील २४ तासांत मान्सून हळूहळू संपूर्ण राज्यभरात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! एक रुपयात पीक विमा
Mumbai News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर… मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट मदत..!