Weather Today: बंगालच्या उपसागर आणि मध्य प्रदेशवरील वाऱ्यामुळे हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामानात होणारा बदल दिसून येत आहे. राज्यात अनेक शहरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने या बाबत अंदाज जारी केला असून आपण राज्यातील हवामानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्तामुळे अनेकांना उन्हामुळे दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या मते, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांसह गडगडाटी वादळे, ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु काही भागात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, आणि यवतमाळ यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूरलाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, खान्देश भागात हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता कमी आहे.
उष्णतेपासून दिलासा मिळणार असला तरी पिकांसाठी चिंता व्यक्त केली जात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२५ मार्चपर्यंत राज्यातील अनेक भागात हवामान ढगाळ राहणार असून अनेक ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी हवामान सामान्य राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागात मार्चमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते, परंतु आता हवामान बदलामुळे तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळणार आहे.
बदल झाल्यामुळे हवामानातील या चढउतारांना हातभार लागला आहे. मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते, परंतु आता तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.