पुणे : कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने राज्यात शनिवारी (ता. ०४) ते सोमवारी (ता.०६) या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर सहा मार्च रोजी विदर्भामध्ये सगळीकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यंदाचा उन्हाळा काहीसा कडक असेल, असाही हवामानाचा अंदाज आहे.
दरम्यान, मराठवाड्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे.