पुणे Tempreture increased : मार्च ते मे या महिन्यांदरम्यान गुजरात ते पश्चिम बंगाल पट्टय़ात उष्णतेच्या लाटा धडकतील, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्याचा परिणाम राज्यातील तापामानवर होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. (Tempreture increased) तशीच काहीशी परिस्थिती सद्या पुणेकर अनुभवत आहेत. (Tempreture increased) शहरातील तापमानात कमालीचा वाढ झाली असून वाढत्या तापमानाने पुणेकरांना काम फोडला आहे. (Tempreture increased) शहरातील तापमान चाळीशीवर जात असल्याचे दिसून येत आहे. (Tempreture increased) शिवाय येत्या दोन-तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता
पुण्यासह परिसरात गेल्या आठवड्यात तापमानात घट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे चाळीशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदवले गेले होते. त्यानंतर पुन्हा उन्हाच्या झळा पोहचू लागल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या वर नोंदवले जात आहे. उकाडा जाणवत आहे. शुक्रवारी मगरपट्टा आणि लोहगाव परिसरात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे शहर आणि परिसरात सध्या पहाटे देखील उकाडा जाणवू लागला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम असून किमान तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
असे आहे शहरातील कमाल तापमान
मगरपट्टा : ४०.७
लोहगाव : ४०.३
शिवाजीनगर : ३९.०
पाषाण ३९.४
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
pune crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत थांबेना
Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी
Pune Railway news : पुणे रेल्वे स्थानकावरील ७४ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई