पुणे: शहरात आता उन्हाचा चटका वाढला आहे. शुक्रवारी (दि. १६) दुपारचे कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. तसेच उपनगरातील तापमानातही वाढ झाली आहे. तसेच आगामी काही दिवस तापमानात वाढ कायम राहणार असून ३४ अंशापर्यंत तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. शहरात पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे.
शुक्रवारी दिवसभर उन्हाचा चटका आणि काही काळ ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढला. परिणामी, थंड पेय विक्रीच्या दुकानात गर्दी पाहायला मिळाली. किमान तापमान हे २२.२ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या १७ ते २२ ऑगस्ट दरम्यान, शहर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या सरी पडणार आहे.