पुणे : शहरात उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. रविवारी (दि. २८) कोरेगाव पार्कचा पारा ४३.३ अंश सेल्सिअसवर गेला होता. शनिवारी (दि. २७) हे तापमान ४२.८ अंशावर होते. दरम्यान, शहर आणखी तापणार असून, उकाडाही तीव्र वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आकाश निरभ्र व कोरडे होत असल्यामुळे तापमानात वेगाने वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचा झळा, तर रात्री तीव्र उकाडा, असे वातावरण सध्या शहर व परिसरात आहे. सध्या आकाश अंशतः ढगाळ आहे. रविवारी दिवसभर उन्हाचा चटका तीव्र होता. गरम वारे वाहत आहे. शहरासह उपनगरात तापमानात वाढ झाली आहे. शहरात रात्रीचाही उकाडा वाढला आहे. त्यामुळे दिवसाची धग रात्री जाणवत आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन वडगावेशरी येथे २९.९ अंश सेल्सिअसवर गेले आहे. रविवारी संपूर्ण शहरात तापमानात वाढ झाली आहे. वडगावशेरी येथे ४३, हडपसर ४२.७, मगरपट्टा ४१.९, शिवाजीनगर ४१.३, पाषाण ४१, तर एनडीए येथे ४०.४ अंश सेल्सिअस तापमान होते. येत्या २९ एप्रिल रोजी आकाश दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे.