पुणे : शहरात उष्णतेच्या उच्चांक सुरू झाला असून, लोहगाव येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे ३८ ते ३९ अंशापर्यंत खाली आलेले कमाल तापमान मंगळवारी (दि. २२) ४३ अंशाच्या पुढे गेले आहे. पुण्यातील वाढत्या तापमानामुळे मंगळवारी सकाळपासून उन्हाचा चटका जाणवू लागला. दुपारी ऊन असह्य होऊ लागले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कमाल तापमान :
लोहगाव ४३.२, पुरंदर ४२.२, कोरेगाव पार्क ४१.९, राजगुरूनगर ४१.७, तळेगाव ढमढेरे ४१.४, शिवाजीनगर, पाषाण ४१.२, चिंचवड ४१.१, हडपसर ४०.८, बारामती ४०.६, वडगावशेरी ४०.३, मगरपट्टा ४०.१, तळेगाव ३९.९, इंदापूर, बालेवाडी ३९.६, एनडीए ३९.३, आंबेगाव ३९.३, दौंड ३८.४, भोर ३७.६, हवेली ३७.२.