Rain Update पुणे : पुणे शहरात आज शनिवारी (ता.१५) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास गारायुक्त पाऊस झाला आहे. तर हवामान विभागाने पुण्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
पुणेकरांनी सतर्क राहावे…!
पुणे शहरात दिवसा कडाक्याचे उन जाणवत आहे. पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील कात्रजमध्ये गारांचा पाऊस ; व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/28W2yStwbx
— Pune Prime News (@puneprime_news) April 15, 2023
केरळ ते छत्तीसगड दरम्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. सध्या आकाशात मोठे ढग तयार होण्यास सुरवात झाली असून, काही मोठे ढग पुणे शहर व जिल्ह्यावर येत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने पुण्यात व जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, वादळी व वाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच शहराच्या आजुबाजूला चारनंतर पावसाला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.