(Rain Update) पुणे : भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविलाा होता. हा अंदाज खरा ठरत पुणे शहरासह उपनगर भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागात 18 मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. दुपारी 4 ते 6 आणि 6 ते 8 अशा दोन टप्यात पाऊस पडेल असेही सांगण्यात आले होते. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप…!
जोरदार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. औरंगाबाद, नाशिक, जालना, हिंगोली, लातूर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, या भागात देखील पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.