Mumbai News : मुंबई : हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे अभ्यासक अशी ओळख असलेले पंजाबराव डख यांचा यंदाचा हवामानाचा अंदाज चुकला. त्यांच्या या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरूनच सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक भिडले.
पंजाबराव डख यांचा पावसाबाबतचा अंदाज अनेकदा खरा ठरला आहे. त्यामुळे यंदाही त्यांनी मान्सूनचा अंदाज व्यक्त केला होता. यामध्ये 10 जून ते 15 जूनपर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांच्या या अंदाजानंतर शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून बी-बियाणं आणि खतं खरेदी केले. (Mumbai News) परंतु पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची आरडाओरड सुरू झाली आहे.
समर्थक-विरोधक भिडले
पंजाबराव डख यांच्या चुकीच्या अंदाजामुळे व्यापारी मालामाल झाले असून, शेतकरी देशोधडीला लागल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडियात सध्या याच मुद्द्यावरुन त्यांना ट्रोल केलं जात होतं. (Mumbai News) असे असताना सोशल मीडियावर समर्थक-विरोधक एकमेकांना भिडले आहेत.
काय म्हणाले होते पंजाबराव डख?
पंजाबराव डख यांनी 13 जून रोजी अंदाज वर्तवला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, 16 जूनला चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. हे वादळ बाष्प ओढून घेऊन जाणार असून, मान्सून कमकुवत होणार आहे. (Mumbai News) 2015 ला अशीच परिस्थिती झाली होती. जमिनीमध्ये ओल आली तरच पेरणी करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : राज्यातील शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजीचे शिक्षण देणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा!
Mumbai News : “त्या” जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रीया; म्हणाले, आमचा प्रवास…