Weather Update : पुणे : पुणे शहरातही तापमानात घट होणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. 18 डिसेंबरपासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून या वेळी तापमानात आणखी 2 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात आकाश निरभ्र आहे. मात्र काही प्रमाणात दक्षिण-आग्नेय द्वीपकल्पातून आर्द्रता येत असल्याने आर्द्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील 48 तास तापमान सध्याच्या पातळीवरच राहणार आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात आकाश निरभ्र असल्याने तापमानात बदल झाल्याची नोंद आयएमडीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. गेल्या आठवडाभरापासून पुण्यातील तापमानात सातत्याने घट होत असून 18 डिसेंबरपासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकरांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे.
पुढचे दिवस वातावरण कसं असेल?
17 डिसेंबर- सकाळी धुके पडण्याची शक्यता, आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
18 डिसेंबर- सकाळी धुके पडण्याची शक्यता, आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
19 डिसेंबर- दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता
20 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता
21 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता
22 डिसेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता