Maharashtra Weather : मुंबई : भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात चांगलाच बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून पावसाचा जोर दिसणार आहे. त्यामुळे पाऊसकाळ बघून शेतकऱ्याने शेतीची कामे करावीत. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडावे. दक्षिण भारतात तर पावसामुळे शाळा बंद करण्याची अवस्था निर्माण झाली आहे. काही ठीिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.