पुणे : मान्सून पुण्यात दाखल झाला असून, पुढील काही दिवस हलका, मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रविवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. शहराला शनिवारी पावसाने झोडपले होते. ११७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. शहराच्या विविध भागांत गुडघाभर पाणी साचले होते. इमारती, घरात पाणी शिरले होते. श्शीभर पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारीही काही भागांत पाणी साचले होते.
रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नाही. शहरात पावसाला अनुकूल वातावरण आहे. १० जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ११ ते १५ जूनदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे शहरातील तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान २९.२, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस होते.