पुणे : मान्सून पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूनने राज्यासह देशात दमदार हजेरी लावली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास राहणार आहे.
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस/ मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ आकाश राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २६°C च्या आसपास असेल.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 22, 2024
उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.