पुणे : शहरात थंडी कायम असून शुक्रवारी (दि.२९) किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. दरम्यान, दोन दिवसानंतर थंडीचे प्रमाण होणार असून शहरात अंशतः ढगाळ हवामान व सकाळी धुके पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, जिल्हातही थंडीने नागरिक गारठले असून हवेली येथे किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस होते. गेले काही दिवस शहरात किमान तापमान वेगाने घटले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहत असून पहाटे तापमान वेगाने घटत आहे.
एनडीएच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. ते १० अंशावर पोहचले आहे. गुरुवारी ते ८.७ अंशावर होते. तर काही उपनगरातही तापमानात घट झालेली दिसून येत आहे. हडपसर १२.१, कोरेगाव पार्क १४.४, वडगावशेरी १५.९ तर मगरपट्टा येथे किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस होते. शहरात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे.