New Delhi : नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सौराष्ट्र-कच्छ प्रदेशात जमिनीवर धडकल्यानंतर त्याने विनाशाला सुरुवात केली. आता चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर त्यातील वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे, मात्र चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने या भागातील ट्रेन रद्द केल्या आहेत.
कच्छ प्रदेश अजूनही बिपरजॉयमुळे त्रस्त
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ११५ ते १२५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. या वादळात किमान २२ लोक जखमी झाले, तर शेकडो झाडे उन्मळून पडली. तब्बल ९४० गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आणि समुद्राजवळील सखल भागात पूर आला. मदत आणि पुनर्वसन आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, कच्छ आणि सौराष्ट्रातील ९०० गावांमध्ये तब्बल २० विजेचे खांब पडले आहेत आणि ५२४ झाडे पडली आहेत. (New Delhi) चक्रीवादळामुळे एकूण २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या सीमावर्ती जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच वादळी वारे आणि पाऊस सुरू असल्याने कच्छ प्रदेश अजूनही बिपरजॉयमुळे त्रस्त आहे. द्वारकेमध्ये सर्वाधिक २३ झाडे पडली असून, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही.
बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस आणखी काही गाड्या रद्द करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने गुरुवारी केली होती. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण ९९ गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय तीन गाड्या अपेक्षित स्थळी पोहोचण्यापूर्वी थांबवण्यात आल्या आहेत. इतर सात गाड्या त्यांच्या निश्चित स्थानकाऐवजी दुसऱ्या स्थानकावरून चालवल्या जाणार आहे.
आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, “बिपोरजॉय ईशान्येकडे सरकले आणि गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळील पाकिस्तान किनारपट्टीला लागून असलेल्या सौराष्ट्र-कच्छ त्याने ओलांडले. (New Delhi) त्याची श्रेणी अत्यंत तीव्र चक्री वादळावरून गंभीर चक्रीवादळामध्ये बदलली आहे. त्याचा जोर ओसरत आहे. आज १६ जून रोजी राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
याबाबत आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बिपरजॉय पुढील २४ ते ४८ तासांपर्यंत प्रादेशिक हवामानावर परिणाम करत राहील, ज्यामुळे उत्तर गुजरात आणि दक्षिणी राजस्थानच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होईल.
गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल म्हणाले की, कच्छ जिल्ह्यात सध्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. किनारपट्टीच्या जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये रस्ता साफ करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि शक्तिशाली चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. (New Delhi) वन्य प्राण्यांच्या, विशेषत: गीरच्या जंगलातील सिंहांच्या सुरक्षेसाठी राज्य प्रशासनाने काय पावले उचलली आहेत, याचीही पंतप्रधानांनी माहिती घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार; डझनभर राज्यांचे अध्यक्ष बदलणार? काय आहे रणनिती?
New Delhi News : दिलासादायक ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद