Government guidelines on pollution : मुंबई : प्रदूषीत शहरांमध्ये मुंबईचा समावेश असल्याने आता मुंबईकरांची चिंता वाढली आहे. राजधानी मुंबईसह शहरांतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्याचा परिणाम लहान मुलांवर मोठ्यांपेक्षा जास्त भयानक दिसू शकतो. त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्याच्या आरोग्य खात्यानेही पुढाकार घेऊन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सकाळ संध्याकाळचा वॉक, व्यायाम, धावणे टाळावे, सकाळ-संध्याकाळ घराची दारे खिडक्या बंद ठेवा, यात एन-९५ व एन ९९ मास्क, कापडी मास्कचा वापर, असे आवाहन केले आहे. राज्यातील सध्याचे हवामान पाच वर्षांखालील लहान मुले, गरोदर महिला, आजारी नागरिक, वयोवृद्ध नागरिक, वाहतूक पोलीस, सफाई कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिक, यांना हानिकारक असून, योग्य खबरदारी न घेतल्यास मृत्यू ओढवू शकतो, असे आरोग्य खात्याचे पुणे येथील संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी बजावले आहे.
प्रदूषणापासून होणारे दुष्परिरणाम टाळण्यासाठी या आहेत सूचना
- वाहतूक कोंडीची ठिकाणे, दगडखाणी, कोळशावर आधारित उद्योग, वीटभट्टी, उच्च प्रदूषण असलेले उद्योग, वीज प्रकल्प येथे जाणे टाळावे.
- सिगारेट, विडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे
- उघड्यावर कचरा, गोवऱ्या जाळू नका
- घरामध्ये झाडू मारण्याऐवजी व्हॅक्युक क्लिनरचा वापर करा
- वाहत्या पाण्याने डोळे धुवा
- बंद आवारात डासांच्या कॉईल जाळू नये
- एअर प्युरिफायरचा वापर टाळा
- फटाके जाळणे टाळावे