पुणे : आगीची घटना घडल्यानंतर धांदल उडते. काय करावे काहीच सुचत नाही. जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू होते. मात्र, अशा कठीण परिस्थितीत स्वतःसह इतरांचाही जीव वाचवणे आवश्यक असते. आग लागल्यानंतर समयसूचकता दाखवीत तातडीने काय करायला हवे, मदतीसाठी कुठे संपर्क साधावा, याविषयी…
घटना घडल्यानंतर हे करा
– वीजपुरवठा तातडीने बंद करावा.
– घटना कळल्यानंतर तत्काळ इतरांना सावध करा, मोठ्याने आवाज द्या, बाहेरून दरवाजा वाजवा.
– सिलिंडर गॅस बाहेर, काढून विद्युत उपकरणे बंद करावीत.
– ओले रुमाल तोंडाला बांधून, तळमजल्याकडे धाव घ्यावी.
– आग लागल्याचे समजताच सुरक्षारक्षकांना कळवावे.
– ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना तातडीने बाहेर घ्यावे.
– धूर जास्त प्रमाणात असल्यास रांगत भिंतीच्या साह्याने जिन्याच्या दिशेने सरकावे.
अशी असावी यंत्रणा
– सुरक्षारक्षक प्रशिक्षित असावेत.
– अग्निरोधक यंत्रणेचा वापर करण्याबाबतचे सर्वाना प्रशिक्षण द्यायला हवे.
– आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची व्यवस्था असावी.
– तातडीचा संदेश देण्यासाठी अलार्म बटन, बेल ठेवावी.
घटना टाळण्यासाठी हे करा
– जुनी वायरिंग बदलणे.
– अग्निशमन यंत्रणा वेळोवेळी तपासायला हवी.
– रात्री झोपताना, बाहेरगावी जाताना गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करावा.
– वीज यंत्रणेवर अधिक भार येणार नाही अशी व्यवस्था असावी.
– घरात वायरिंग करताना उत्तम दर्जाच्या वायर व इतर गोष्टी वापराव्यात.
– विद्युत पुरवठा, इंधन यांवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करताना योग्य काळजी घ्यावी.
– अशा घटना टाळण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन, जनजागृती व्हावी.
– वायरिंगचे ऑडिट व्हावे.
– शेकोटी अथवा इतर आग पेटवल्यास ती पूर्ण विझल्याची शहानिशा करावी.