पुणे : राज्याट मुसळधार पावसाची सुरवात झाली आहे. आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई पुण्यासह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गात या जिल्ह्यातहि आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन, राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पावसाचा सिक्कीममध्ये धुमाकूळ !
दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने सिक्कीम आणि परिसरात धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री सुमारे २२० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. तिस्ता नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खोल दरीतून वाहणारी नदी आता रस्त्याच्या पातळीवर आल्याने त्याची तीव्रता लक्षात येते.