पुणे : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला दिसत नाही. आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस..
हवामान विभागाकडून आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचा इशार देण्यात आला आहे. दुसरीकडं सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
‘या’ तारखेपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
चांगला पाऊस झालेल्या भागात आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीचे कामे पूर्ण झाले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे, त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, राज्यात उद्यापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आले.
काही भागात पावसाची ओढ …
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात कमी पाऊस झाला आहे, असे असून सुद्धा शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पेरण्या केल्या आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, पाऊस पडत नसल्यानं शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढवलं आहे.