पुणे प्राईम न्यूज: गुगल आपल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबवर कंटेंटसाठी फिल्टर वापरते. परंतु, त्यात एक मोठा बग आला आहे, ज्याचा फायदा घेत लोक युटूबवर अश्लील व्हिडिओ अपलोड करत आहेत. अशा परिस्थितीत यूट्यूबवर अश्लील मजकुराचा महापूर आला आहे. युट्युबला देखील या बगबद्दल माहिती मिळाली आहे आणि ते निराकरण करण्यासाठी काम करत आहे. याबाबत हॅकिंग ग्रुपने माहिती दिली आहे. पॉर्नहबसारख्या प्रौढ साइटवरील सामग्री थेट युट्युबवर शेअर केली जाऊ शकते, असा दावा या हॅकर्स गटाने केला आहे.
युट्युबचे अल्गोरिदम बायपास केले गेले आहे. यूट्यूबवर प्रौढ सामग्रीबाबत एक ग्रुप देखील तयार करण्यात आला आहे, ज्याला यूट्यूब पॉर्न हंटर असे नाव देण्यात आले आहे. हे सर्व युट्युबच्या अडल्ट कंटेंट पॉलिसी धोरणाचा अवमान करत आहेत. युट्युबची अडल्ट कंटेंट पॉलिसी शिक्षण, माहितीपट आणि वैज्ञानिक कंटेंटला लागू होत नाही. मायबर्ग नावाच्या अहवालात या हॅकर ग्रुपचा शोध लागला आहे. हे ग्रुप व्हिडिओ शीर्षक, वर्णन इत्यादीमध्ये बदल करून अडल्ट कंटेंटचे व्हिडिओ अपलोड करत आहेत.
हा अहवाल समोर आल्यानंतर अनेक व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. गुगलने या बगवर म्हटले आहे की, ते असे व्हिडिओ हटवत आहे आणि असे व्हिडिओ पोस्ट करणारे चॅनेल देखील बंद केले जातील.