नवी दिल्ली : स्मार्टफोन वापरताना तुम्हाला त्यातील काही गोष्टींची माहिती असू शकते तर काहींची माहिती नसेलही. तुम्हाला माहितीये का तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्री-इन्स्टॉल असे एक फीचर आहे त्याचं नाव नॉईज कॅन्सलेशन (Noise Cancellation).
फोनच्या तळाशी छोट्या छिद्राला मायक्रोफोन ग्रिल म्हणतात. हा होल फोनमधील नॉईज कॅन्सलेशन फीचर म्हणून काम करतो. हा मायक्रोफोन ग्रिल फोनवर बोलत असताना आसपासच्या आवाजामुळे निर्माण होणारा ध्वनी कमी करण्याचे काम करतो. याशिवाय फोनच्या वर दिलेल्या मायक्रोफोन ग्रिलचीही मदत घेते.
आवाज कमी करण्यासाठी मायक्रोफोन ग्रिल विशेष अल्गोरिदम वापरते. या फीचरमुळे फोनवर बोलत असताना आजूबाजूच्या आवाजामुळे समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकण्यात कोणतीही अडचण येत नाही. या फीचरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणीही समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
सर्वच फोनमध्ये नाही हे फिचर
मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये नॉईज कॅन्सलेशन आहे असे नाही. अशातच जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की फोनमध्ये नॉईज कॅन्सलेशन फीचर देण्यात आले आहे की नाही, तर तुम्ही फोनच्या मॅन्युअलवर जाऊन हे जाणून घेऊ शकता किंवा फोनच्या अधिकृत वेबसाईटवरूनही ही माहिती मिळवू शकता.