व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, May 26, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीसाठी जास्त वाट पाहावी लागणार; १ डिसेंबरपासून नवीन नियम लागू होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 November 2024, 17:38
Your OTP could get delayed after December 1 as TRAI’s new traceability guidelines to kick in

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) ने गेल्या काही महिन्यांत फसव्या कॉल्स आणि मेसेजला सामोरे जाण्यासाठी तसेच ग्राहकांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ट्रायने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि सरकारी मालकीच्या बीएसएनएलसह सर्व दूरसंचार कंपन्यांना १ डिसेंबरपासून ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे ग्राहकांना ओटीपी येण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रायचे हे पाऊल ग्राहकांना बनावट कॉल आणि संदेशांपासून वाचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे अनेक प्रकारचे धोके समोर आले आहेत. स्मार्टफोनने अनेक कामे सुलभ झाली आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्गही उपलब्ध झाले आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये लोकांच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट ओटीपीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ट्रायने अलीकडेच लोकांना फसवणूक आणि ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी अनेक उपाय लागू केले आहेत. फिशिंग आणि स्पॅम सारख्या फसवणुकीचा मागोवा घेतला जाणार आहे आणि संदेश ट्रेसिबिलिटीद्वारे थांबवला जाणार आहे. ट्रायचा हा नियम सुरक्षित मेसेजिंग सिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

नवीन नियमांनुसार, आता मेसेज पाठवणाऱ्यापासून प्राप्तकर्त्यापर्यंत पूर्णपणे शोधण्यायोग्य म्हणजेच ट्रेसिबल असणार आहे. ऑगस्टमध्ये सर्वप्रथम या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या ट्रेसिबिलिटी प्रक्रियांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या विनंतीवरून ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ३० नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीनंतर कंपन्यांना संदेश ट्रेसिबिलिटी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

१ डिसेंबरपासून नवीन नियम लागू

ट्रायने टप्प्याटप्याने या नियमांची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली होती आणि कंपन्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत या सूचनांचे पालन होत असल्याची खात्री करण्यास सांगितले होते. १ डिसेंबरपासून मार्गदर्शनाचे पालन न करणाऱ्या व्यवसायांचे संदेश ब्लॉक केले जाऊ शकणार आहेत. याव्यतिरिक्त ट्रेसिबिलिटी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे १ डिसेंबरपासून ओटीपी प्राप्त करण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑनलाईन बँकिंग , बुकिंग आणि इतर सेवांसाठी वापरकर्त्यांना ओटीपी मिळण्यास अधिक वेळ लागू शकणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्युतवाहिनी टाकण्याचे काम अद्यापही अपूर्ण, खराडीतील नागरिकांची गैरसोय

Monday, 26 May 2025, 13:58

सीसीटीव्ही कॅमेरा शाळेतील वर्गात, स्वच्छतागृहांबाहेर लावणे आता बंधनकारण, राज्यातील शाळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Monday, 26 May 2025, 13:33

महाराष्ट्रात ४३ नवीन कोविड-१९ रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांची संख्या २०९ वर

Monday, 26 May 2025, 13:05
2.5 lakh quintal seed supplied by mahabeej mahaarshtra

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

Monday, 26 May 2025, 12:56

बारामती: खाजगी कोचिंग क्लास चालकाला 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक

Monday, 26 May 2025, 12:43
monsoon speed to slow down in maharashtra farmers should wait for sowing

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार

Monday, 26 May 2025, 12:18
Next Post

शाळकरी मुलाच्या डोक्यात घातला दगड; कोंढव्यातील घटना

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.