मुंबई : सध्या टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात सायबर हल्लेही होत आहेत. सायबर गुन्हेगार चांगलेच अॅक्टिव्ह होत असल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले आहे. असे असताना सध्या OTP आधारित फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकणार आहे.
OTP फ्रॉडमध्ये सायबर गुन्हेगार बँकेच्या टोल फ्री नंबरची मदत घेतात. अनेक प्रकरणांमध्ये, सायबर गुन्हेगार एखाद्या वित्तीय संस्थेचे अधिकारी म्हणून फसवणूक करतात. तर अनेक प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगार पोलिस अधिकारी असल्याचे भासवतात. सायबर गुन्हेगार लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील, कार्ड क्रमांक, CVV क्रमांक, OTP क्रमांक यांसारखी संवेदनशील माहिती चोरतात.
या टिप्स नक्की फॉलो करा…
– कोणत्याही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सकडे दुर्लक्ष करा.
– फोन कॉल किंवा मेसेजद्वारे वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. जसे OTP, कार्ड नंबर, कार्ड एक्सपायरी डेट आणि CVV नंबर.
– जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि तुम्हाला कॅशबॅक किंवा डिस्काउंट ऑफरचे आमिष दाखवले गेले तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, ही फसवणूक असू शकते.
– बँकेचे तपशील कोणाशीही शेअर करण्यापूर्वी त्यांची योग्यरित्या पडताळणी करा. मात्र, बँकेकडून कधीही वैयक्तिक माहिती विचारली जात नाही हेदेखील ध्यानात ठेवा.