नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातच आता प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आपले नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने चीनमध्ये Redmi Note 14 सीरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये तीन स्मार्टफोन आणले आहेत. कंपनीने Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+ लाँच केले आहेत. हे सर्व स्मार्टफोन AMOLED डिस्प्ले सह येतात.
Redmi Note 14 सीरीज सध्या फक्त चीनपुरती मर्यादित आहे. या सीरीजमध्ये Redmi Note 14 ची किंमत 1199 युआन (अंदाजे 14,500 रुपये) पासून सुरू होते. तर Redmi Note 14 Pro ची किंमत 1499 युआन (अंदाजे रु. 18 हजार) पासून सुरू होते. तर Redmi Note 14 Pro+ ची किंमत 1999 युआन (अंदाजे रु. 24 हजार) पासून सुरू होते. या फोनमध्ये 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6200mAh तर 5110mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. यात स्टिरिओ स्पीकर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि इतर वैशिष्ट्ये आहेत. Redmi Note 14 मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.
यात MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर आहे. हा फोन Android 14 वर आधारित Hyper OS वर काम करतो. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळत आहे.