नवी दिल्ली : सध्या टेक मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच यांसारखे इतरही गॅजेट्स मिळत आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने आपला नवा Xiaomi Pad 7 नुकताच लाँच केला आहे. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले असून, 12 GB RAM आणि 256 GB ROM असलेला व्हेरिएंट तुम्हाला 30999 रुपयांत मिळू शकणार आहे.
Xiaomi च्या Pad 7 ची Pad 6 शी तुलना केल्यास, कंपनीने डिझाईनमध्ये बराच बदल केला आहे. सर्वात चांगले फीचर म्हणजे या पॅडचे वजन खूपच कमी करण्यात आले आहे. याशिवाय, पॅड देखील खूप स्लीम असा डिझाईन केला गेला आहे. त्यामुळे हा पॅड तुम्हाला कुठंही, कधीही नेता येऊ शकतो. यामध्ये उत्तम कॅमेरा सेटअप तुम्हाला बॅक पॅनलवरच दिला गेला आहे. या डिझाईनमुळे तुम्हाला की-पॅड आणि पेन जोडणे देखील सोपे होऊ शकतं. याचा की-बोर्ड तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला की-बोर्डजवळ आणावे लागेल आणि पॅड आपोआप कनेक्ट होऊ शकेल.
या पॅडला 11.1 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीकडून AMOLED डिस्प्ले दिला जाईल, अशी शक्यता होती. मात्र, आता कंपनीने LCD डिस्प्ले दिला आहे. Xiaomi Pad 7 मध्ये, तुम्हाला Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर दिलेला आहे. या प्रोसेसरची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला दैनंदिन कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण तुम्ही ते सहज वापरू शकता. तसेच स्पीडही चांगला असणार आहे.