नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Xiaomi ने भारतात आपला नवीन स्वस्तालील 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Snapdragon 4s Gen 2 चिपसेटसह मिळत आहे. मात्र, या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5G चा सपोर्ट मिळणार नाही. कंपनीकडून याचे कारणही दिलं आहे.
Redmi A4 5G हा स्मार्टफोन Xiaomi च्या अधिकृत वेबसाईटवर लिस्टेड करून देण्यात आला आहे. चिपसेट कंटेंट असे नमूद करण्यात आले आहे. डिव्हाईस केवळ SA (स्टँडअलोन) 5G नेटवर्कला सपोर्ट करणार आहे. 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) ला स्मार्टफोन सपोर्ट करत नाही. एअरटेल भारतात NSA (नॉन-स्टँडअलोन) आर्किटेक्चरवर काम करणार आहे.
एअरटेल भारतात 5G नेटवर्कसाठी NSA (नॉन-स्टँडअलोन) आर्किटेक्चर वापरत आहे आणि Jio SA आर्किटेक्चर वापरते. अशा परिस्थितीत, Redmi A4 5G एअरटेलच्या 5G ला सपोर्ट करणार नाही. Redmi A4 5G ची भारतात किंमत 8,499 रुपये आहे. याचा बेस मॉडेल 4GB/64GB स्टोरेज या किमतीत उपलब्ध आहे. तर, 4GB/128GB 9,499 रुपयांना खरेदी करता येईल. भारतात त्याची विक्री 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.