नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, कंपन्यांकडून बेस्ट फीचर्स दिले जात आहेत. पण, तरीही स्मार्टफोन असो वा कॉम्प्युटर वापरताना एक समस्या येते ती म्हणजे Spam Messages ची. तुम्ही देखील Spam Messages ने चिंतेत आहात तर आम्ही तुम्हाला त्यापासून वाचायचं कसं याची माहिती देणार आहोत.
Google Messages मध्ये स्पॅम संरक्षण सुरू करा. तुमच्या स्मार्टफोनवर Google Message ॲप उघडा. यानंतर, वरच्या उजव्या बाजूला प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर मेसेज सेटिंग्जवर क्लिक करा. यानंतर, स्पॅम प्रोटेक्शनच्या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर त्याचे टॉगल अॅक्टिव्ह करा. हे केल्यानंतर स्पॅम प्रोटेक्शन फीचर चालू होईल, अशा पद्धतीने गुगल मेसेजेसमध्ये कोणताही स्पॅम मेसेज आला तर तो वेगळ्या फोल्डरमध्ये जाईल.
Google Messages मध्ये स्पॅम मेसेज कसे करायचे ब्लॉक?
सर्वप्रथम डिव्हाईसवर Google Message ॲप उघडा. यानंतर, वरच्या उजव्या बाजूला प्रोफाईल पर्यायावर क्लिक करा. हे केल्यानंतर, स्पॅम आणि ब्लॉक या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला एखादा विशिष्ट क्रमांक ब्लॉक करायचा असेल तर उजव्या बाजूला असलेल्या मेनूवर जा. यानंतर तुम्हाला ब्लॉक नंबरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अज्ञात क्रमांकाच्या पुढे दिलेला टॉगल अॅक्टिव्ह करावा लागेल. जर तुम्हाला नंबर जोडायचा असेल तर Add a number वर क्लिक करा.