टोकियो : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक नवनवीन यंत्रणा समोर येत आहेत. त्याचे फायदेही अनेक आहेत. त्यातच AI अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता हाच AI लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी व सरळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही कधी नोकरी सोडणार हे देखील हाच AI सांगणार आहे.
जपानी संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) टूल तयार केले आहे. या टूलसह कंपनीतील एखादा कर्मचारी किती दिवस ही नोकरी करणार आणि कधी ही नोकरी सोडणार हे एआय आधीच तुमच्या बॉसला कळविणार आहे. हे नवीन टूल तयार करण्यासाठी ‘टोकियो सिटी युनिव्हर्सिटी’चे प्राध्यापक नरुहिको शिराटोरी यांनी एका जपानी भांडवलावर आधारित स्टार्ट-अपसोबत टायअप केले आहे.
AI असे करेल काम…
– एआय टूल कंपनीतील कर्मचाऱ्यांचा डेटा, त्यांच्या उपस्थितीच्या नोंदीपासून ते वय, लिंग यांसारख्या वैयक्तिक माहितीपर्यंतचा डेटा गोळा करेल. हे टूल प्रत्येक फर्मचे टर्नओव्हर मॉडेल तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सुटीचा पॅटर्न, कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास करून एक अहवाल तयार करेल. त्यानंतर एआय टक्केवारी गुणांमध्ये कोण नोकरी सोडून जाईल याचा अंदाज लावेल.