पुणे : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर लवकरच येणार आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप युझर्सला थर्ड पार्टी अॅप्स जसे की, टेलीग्राम सिग्नल, आयमेसेज आणि गुगुल मेसेजवर मेसेजिंग आणि कॉलची सुविधा देणार आहे. मेटाने व्हॉट्सअॅपमध्ये ही सर्व्हिस इंटीग्रेट करण्याचा प्लॅन शेअर केला आहे. या बाबत कंपनीने ब्लॉग पोस्टमध्ये माहिती देतांना म्हटलं आहे की, यूझर्सची गोपनीयता व सुरक्षा राखण्यासाठी कंपनी या प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासोबतच मेटाने एक फोटोही शेअर केला आणि व्हॉट्सॲप आणि मेसेंजरवर थर्ड पार्टी चॅट्स कसे दिसतील हे देखील दाखवलं आहे.
विशेष म्हणजे यामध्ये युझर ठरवू शकतील की, त्यांना कोणत्या थर्ड पार्टी अॅपवरुन मेसेज रिसीव्ह करायचा आहे. मेटानुसार युझर्स सर्व मेसेज एकाच इनबॉक्समध्ये पाहू शकतील.
जर यूझर्सची इच्छा असल्यास, ते थर्ड पार्टी चॅटसाठी स्वतंत्र फोल्डर देखील तयार करू शकणार आहेत. वापरकर्त्यांना ‘रिच मेसेजिंग फीचर्स’ जसे की टाइपिंग इंडिकेटर, रीड रिसीप्ट, डायरेक्ट रिप्लाय आणि थर्ड पार्टी ॲप्ससह चॅटिंगसाठी प्रतिक्रिया मिळतील. कंपनीने सांगितले की ते 2027 मध्ये कॉलिंगचे फीचरचे अपडेट यूझरसाठी उपलब्ध करून देतील. मेटा ने युरोपियन युनियनच्या डिजिटल मार्केट ॲक्ट अंतर्गत व्हॉट्सॲप आणि मेसेंजरमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हॉट्सअॅप लवकरच ग्रुप चॅटमध्ये कॉल लिंक चे फिचर ऑफर करेल. व्हॉट्सअॅपच्या या अपकमिंगची फिचरची माहिती WABetalnfo ने दिली आहे. रिपोर्टनुसार या फिचरच्या मदतीने युझर्स ग्रुप चॅटमध्येच कॉल लिंक क्रिएट करु शकतील. या फिचरची विशेषता म्हणजे, यामधून केले जाणारे कॉल्स युझर्सला रिंग न करता सुरु होतील.
हे नवे फीचर गुगल मिट सारखेच आहे, ज्यामध्ये युझर्स लिंकद्वारे इतर सदस्यांशी कनेक्ट होतात. WABetaInfo ने Android 2.24.19.14 साठी WhatsApp Beta मध्ये हे फिचर आणणार आहे. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, हे फिचर जागतिक युझर्ससाठी बाजारात आणले जाणार आहे.